Posts

Showing posts from December, 2021

माझे 'ट्रेन' मॉडेलिंग

Image
  ट्रेन मध्ये   दुसऱ्या श्रेणीने   प्रवास करण्यात खरी मजा येते . अनेक प्रकारची माणसे भेटतात , प्रवासापुरती   किंवा कायमचीही गट्टी जमते आणि मुख्य म्हणजे प्रवास सुसहाय्यच काय तर अविस्मरणीयही होतो .   आज पनवेल ते पुणे ( नांदेड एक्सप्रेस ) 2nd क्लास सिटिंग मध्ये बसलो . बाजूच्या सीटवर एक पांढरा फुल शर्ट आणि पॅन्ट घातलेला इसम फोनवर जोरात बोलत बसला होता . आमची बाजू रिकामी असल्यामुळे त्याचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते , " इथे नुसता भात खात आहे , दुसरं काही नाही . इतके महीने भात भात खाऊन अगदी कंटाळा आला आहे . आपल्याकडे कसं चिकन , मटण , पोळी , पालक वगैरे असते , इथे तर फक्त भात आणि ते काय ते पडवलं बस्स ". हे ऐकून मला हसू फुटले ( का नाही फुटणार , भाताचा विषय माझ्याही हृदयाजवळचाच ).   h अंक पहिला मला हसताना बघून तो ही माझ्याकडे बघून हसला . फोन झाल्यावर बोलणे सुरू झाले . तो लातूर जवळच्या परळी वैजनाथ इतला रहिवासी. पनवेल जवळच्या पेण ला राहून आश्रम शाळेत शिकवत होता...

यावा कोकण आपलाच असो (जोपर्यंत महापुरुष तुमचा रक्षणकर्ता असो)

Image
  नशीबाने माझ्या सासुरवाडीचे गुगल लोकेशन कोकणात येते . लग्न झाल्यापासून मोजून ४ किंवा ५ वेळा मी सासुरवाडीला गेलो असेन . तसे पोयरे गाव ही लगेच पोहोचता येईल असे नाही . सकाळ सकाळच्या जनशताब्दी एक्सप्रेसने कितीही लवकर कणकवलीला पोचवलं तरी तिथून पुढे पुलाखालून भाड्याची टमटम पकडून आचरा तिठा गाठेपर्यंत पाऊण - एक तास जातो . मग तिथून प्रायव्हेट रिक्षा ठरवायची आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीने व्यापलेला दोन एक किलोमीटर रस्ता पार करून पोयरे गाव जवळ करायचे . मुख्य रस्त्यापासून उजवीकडे झाडीत लुप्त होणारा , दगड धोंड्यांचा उतरता रस्ता दिसला की रिक्षावाल्याला विनवणी करून दगडांवरून रिक्षा खाली थेट अण्णांच्या घरासमोर ( आमचे सासरे पांडुरंग नाडकर्णी यांना गावात सगळे अण्णा म्हणूनच ओळखतात ) थांबवायची . आमचे स्वागत करायला आणि रिक्षावाल्याशी मालवणीत बोलायला माझे ८२ वर्षीय सासरे न चुकता दारात हजर असणार हे आतापर्यंतचे ठरलेले . याही वेळेला ते हजर होते , नको नको म्हणत असताना आमच्या हातातून बॅ...