Posts

Showing posts from March, 2021

अक्षी गावच्या दानवांच्या भन्नाट गोष्टी

Image
अक्षी गावातील देवांच्या गोष्टी इथे वाचा https://bit.ly/3tUnJUP आणि आता पुढे, बॅक टू दानव... रविवार , २१ मार्च २०२१ अलिबाग मधील अक्षी गावात माझा तिसरा दिवस होता. आज चेक आऊट करायचे , कुलाबा किल्ल्यावर जायचे आणि तेथून दुपारी जेवणावर ताव मारून तडक नवी मुंबईला निघायचे असा बेत ठरला होता. आदल्या दिवशी कनकेश्वरच्या ६५०+६५०=१३०० पायऱ्या चढून उतरून सर केल्यामुळे सगळे जरा दमले होते. त्यात परत भारत-इंग्लंड टी-२० मॅच ने रात्र खाल्ली आणि झोपायलाही ११.३० वाजले. त्यामुळे सकाळी मी एकटाच लवकर उठलो , पटापट आवरले आणि खाली भटकायला बाहेर पडलो. हॉटेलच्या बाजूलाच एक तलाव बघितला होता. त्याचा मत्स्यपालन करण्यासाठी उपयोग करत होते असे समजले. म्हटलं आज सकाळी परत त्या तलावाला भेट देऊ , काठावरचे पक्षी बघू आणि वाटलं तर अक्षी बीच वर एक चक्कर मारून परत येऊ. हॉटेलच्या मोठ्या गेटच्या बाहेर आलो आणि तलावाकडे चालू लागलो तर असे लक्षात आले की माझ्याबरोबर अजून एक इसम चालत आहे. मी त्याच्याकडे बघितले तर तो गावातलाच कोणीतरी दिसत होता. तो मी त्याच्याकडे बघण्याची वाटच बघत होता. त्याने लगेच मला वेळ विचारली आणि मी सांगितली. त...

अक्षीच्या दैवतांच्या गोष्टी

Image
इतिहासाच्या सान्निध्यात घालवलेली एक संघ्याकाळ आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. एक आहे देवांची आणि दुसरी दानवांची. हे दोघे ,  देव-दानव राहतात एकाच गावात , अक्षी त्याचे नाव. पण ते गुण्यागोविंदाने राहत असतील की आणि कसे राहत असतील ते तुम्हीच ठरवा. कोरोना काळात फारसे भ्रमण शक्य झाले नसल्यामुळे डिसेंबरची अल्हाददायक सुट्टी निरर्थक वाया गेली. आला मार्च महिना , मुलगा ओम याला सुट्टी मिळाली , पत्नी शीतलनेही वार्षिक सुट्ट्या संपवण्यासाठी सुट्टी घेतली आणि आमची अलिबाग मधील अक्षी बीच वर ट्रिप नक्की झाली. १९ मार्च २०२१ला सकाळी आम्ही (मी , शीतल , ओम , शीतलची बहीण सुप्रिया आणि तिचे पती निलेश) असे पाच जण अक्षी येथील हॉटेल सी ब्लिस (आधीचे हॉटेल सूर्यकिरण) मध्ये जेवणाच्या वेळेस पोहोचलो. त्यांच्या सुंदर , स्वच्छ , रंगवलेल्या नारळाच्या आणि सुपारीच्या माडीमध्ये चविष्ट जेवण झाले , दुपारी तासभर झोप झाली आणि संध्याकाळी अक्षी बीचवर सोनेरी सूर्यास्ताचा आनंद लुटत समुद्रात डुंबूनही झाले. दुसऱ्या दिवशी , म्हणजेच २० मार्च २०२१ पांडवकालीन कनकेश्वर देवळात ६५० पायऱ्या चढून शंकराचे दर्शन घेऊन आलो आणि ...