कोर्टात एक दिवस
नाही नाही , मी चोरी केली नाही , विनातिकीट प्रवास केला नाही , वाहन चालवताना नियम मोडला नाही , खून - मारामारीही केली नाही . मग कोर्टात जायची वेळ का यावी माझ्यावर ? कळेल लवकरच. फोन नाट्य मी McCann advertising मध्ये असताना वडाळा ते परळ बस ने जात असे . तो दिवस होता बुधवार १ जून २०२२ ! ऑफिस सुटल्यावर मी बस पकडली . नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी होती . पाऊसाचे दिवस असल्यामुळे हलत्या बसमध्ये उभ्या उभ्या मी छत्री , बॅग सांभाळत तिकिटासाठी बॅग मधून पाकीट काढण्याची जरा अजागळ कसरत करत होतो . तेवढ्यात शेवटच्या सीटवरचा एक प्रवासी उठला आणि मला बसायला जागा मिळाली . हुश्श . वडाळा स्टेशन जवळ येताच मी उठलो आणि गर्दीतून वाट काढत मागच्या दारातून उतरण्यासाठी पुढे झालो . जसं उतरायची वेळ आली तशी धक्काबुक्कीला सुरुवात झाली . त्या धक्काबुक्कीत माझी बॅग मागे कोणाच्यातरी खांद्यावर अडकली . बॅगमध्ये पाकीट असल्याकारणाने मी बॅग ओढत पुढे हलण्याचा प्रयत्न करत होतो . पूर्ण लक्ष बॅगकडे. कशीबशी बॅग ...