Posts

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

Image
अयोध्या राम जन्मभूमी, १४ डिसेंबर २०२५ आम्ही राम मंदिरमध्ये सुगम दर्शनाचे आगाऊ बुकिंग करून ठेवले होते. वेळ होती सकाळी ९ ते ११. सकाळी राहत्या ठिकाणी वीजने धक्का दिला आणि गायब झाली. त्यामुळे सकाळी नऊ ऐवजी दहा वाजता मी, शीतल आणि ओम देवळाकडे जाणाऱ्या पथावर पोचलो. मजल दरमजल करत, एकेक सुरक्षा चौकी ओलांडत राम मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होतो. आणि काही वेळाने समोर बदामी रंगाचे राम मंदिर दृष्टीक्षेपात आले. देवळाच्या छतावर कामगार किंवा कारागीर काम करताना दिसत होते म्हणजे अजून देऊळ पूर्ण झाले नव्हते. आजूबाजूचा परिसरातही जोमाने काम चालू असलेले दिसले. कमीत कमी पुढची २-३ वर्षे तर पूर्ण होण्यासाठी लागणार हे नक्की.  हा शेवटचा सुरक्षा थांबा. इथे मोबाईल, बेल्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू लॉकर मध्ये ठेवाव्या लागतात. त्यामुळे इथून पुढे फोटो बंद. काही वेळातच हळू हळू, एकेक पाऊल पुढे सरकवत आम्ही देवळात शिरलो. भिंतींवर रथावर आरूढ  सूर्य देवाची मूर्ती, दुसरीकडे राम सेवेत मग्न हनुमान आणि इतर देवता बघत उभे राहिलो. रांगेत उभे असताना डावीकडे थोड्या पायऱ्या चढून वर काही भक्त जात होते. सुरक्षारक्षकाला विचारलं त...

गप्पिष्ट आणि शिष्ट - एक ट्रेन गाथा

Image
सौ यांची इच्छा झाली. त्याला श्री यांची भटकंतीची साथ मिळाली आणि जन्म झाला द्वारका दर्शन प्लॅनचा. २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार आला, आणि शुक्रवारची सुट्टी घेऊन आम्ही रेल्वेने दुपारी २ वाजता द्वारका पोहोचलो.  द्वारका मध्ये पाऊल ठेवताच आठवणीत ठेवण्यासाठी सेल्फी तो बनता है ना द्वारकाधीश देवळाबाहेर  एक क्षण. पावसाला सुरुवात झाली होती आणि रात्रीपर्यंत पावसाने विश्रांती घेतलीच नाही शीतलच्या ऑफिस मधल्या एका गुजराती सहचारीच्या ओळखीने आणि मदतीने संध्याकाळी तब्बल ३ तास आम्हाला द्वारकाधीश देवळात कृष्णाचा आणि द्वारकेचा इतिहास समजण्याचे भाग्य लाभले.  द्वारकाधीश देवळाचा कोपरा न कोपरा दाखवणारे आणि त्याची माहिती देणारे जास्मिन भट यांच्यासोबत एक आठवण म्हणून क्लीक दुसऱ्या दिवशी द्वारका दर्शन बसने नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, रुक्मिणी देऊळ आणि गोपी तलाव या जागांचे दर्शन घेऊन झाले. ती एक वेगळीच गोष्ट आहे. गोपी तलावात मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करताना. इथे १६० गोपींना कृष्णाने मोक्ष प्राप्त करून दिलं होतं. सुंदर रुक्मिणी देऊळ. देवळात शिरण्यापूर्वी तिथल्या पुजाऱ्याने गोड गुजराती शैलीत सर्वांना ...

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने

Image
ऑगस्ट-सप्टेंबर महिने म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या दैवतेच्या आगमनाची चाहूल आणि लगबग दोन्ही एकत्र घेऊन येणारे महिने. अशातच पर्यावरण जपून गणपती बाप्पांची शाडूची मूर्ती बनवण्याकडे वाढता कल लक्ष वेधून घेणारा असतो. विविध ग्रुप ऑनलाईन किंवा ऑफलाईन गणपती मेकिंग वर्कशॉप (पैसे घेऊन किंवा स्वेच्छेने) घेत असतात.  रोटरी क्लब ऑफ खारघर, या रोटरीच्या शाखेने असाच एक पर्यावरण प्रेमी गणपती मूर्ती बनवण्याचा वर्कशॉप २५ ऑगस्ट २०२४ रोजी घ्यायचे जाहीर केले. हा वर्कशॉप फेसबुक लाईव्ह आणि गूगल मीट वर होणार होता. मी या वर्कशॉपची  खूप उत्सुकतेने वाट बघत होतो कारण गेली काही वर्षे मला घरीच मूर्ती बनवावीशी इच्छा होती. पण हस्तकला आणि माझं लहानपणापासून काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे कोणी शिकवणारा पाहिजे होता. ती संधी आपसूक चालून आली. योगायोगाने पुण्याला गेलो असताना मला एका हार्डवेअर दुकानात आकस्मितरित्या शाडूची मातीही मिळाली. साठ रुपयांना दोन किलो! ठरल्या प्रमाणे २५ ऑगस्टला मी आणि ओम (माझा आठवीत असलेला सुपुत्र) दोघांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली आणि टॅब समोर आसनस्थ होऊन गणपती बाप्पा बनवायला सुरुवात केली....

एक वाक्य, एक तास, चार स्त्री पॉवर

Image
फिरस्ती महाराष्ट्र तर्फे पळसदेव येथील शिव आणि विष्णू देवळांचे सुरेख दर्शन झाले. पुढील दोन -तीन महिन्यात ही देऊळे उजनी धरणाच्या पाण्याखाली समाधी घेणार. ही देऊळे बघून झाल्यानंतर उजनी धरणाच्या दुसऱ्या तटावर एका छोट्याशा उंचवट्यावर असलेले सरडेश्वर देऊळ येथे दुपारच्या रणरणत्या उन्हात जाणे झाले. देवळाच्या बाहेरील भागात रामायणातील अप्रतिम कलाकुसर बघून मन तृप्त झाले. दुपारी भिगवण येथे संदीप नागरे यांच्या 'अग्निपंख' घरी, छान दुपारच्या वाऱ्यात स्वादिष्ट पिठलं-भाकरी जेवण रिचवलं आणि भिगवण पासून अंदाजे २० कि मी असलेल्या प्राचीन राशीन देवीच्या देवळात दोन उंच दीपमाळा बघून घेतल्या. पळसदेव शंकर देऊळ - हे उजनी धरण क्षेत्रात असल्यामुळे वर्षभर धरणाच्या पाण्याखाली असते आणि फक्त एप्रिल-मे महिन्यात पाण्यावर येते ते पण दर वर्षी नाही. १९७५ पासून २०२४ पर्यंत फक्त ५ वेळा हे देऊळ पूर्ण पाण्याबाहेर आले आहे. पळसदेव देऊळ उजनी धारण क्षेत्राच्या मधोमध आहे. धरणाच्या दुसऱ्या तटावर, एका छोटाशा कड्यावर हे सरडेश्वर देऊळ उभे दिसते. इथे रामायणातील अनेक प्रसंग अप्रतिम रित्या देवळाच्या बाहेरील भागात कोरलेले आढळतात. एवढ...

GPS गोंधळ

Image
GPS गोंधळ  aka GPS (गोंधळलेले पळापळीचे स्रोत) एखादी ट्रिप/ टूर म्हटलं की जशी उत्सुकता असते तसे त्याचबरोबर नियोजन ही येतं. ७ एप्रिल २०२४ रोजी 'फिरस्ती महाराष्ट्र' या इतिहासप्रेमी, भटकंतीप्रेमी ग्रुप ने पुण्यापासून १०० कि. मी. असलेले 'पळसदेव देऊळ' हेरिटेज टूर आयोजित केली होती. ऐन वेळी माझे पुण्याला जायचे ठरले आणि मी अनुरागला (फिरस्तीकार) एक सीट आहे का विचारले. नशीबाने माझ्यासाठी एक सीट शिल्लक होतीही! आदल्या दिवशी अनुरागने पळसदेवला जाणारी बस कोणत्या मार्गाने येणार आणि किती वाजता ठरलेल्या प्रत्येक थांब्यावर पोचेल याचे सविस्तर पोस्ट टाकले. माझ्या सोयीचे स्वारगेट होते म्हणून मी लगेच कळवून टाकले. स्वारगेट ला बस पोचायची वेळ होती सकाळी ६.३०, म्हणजे तशी निवांत वेळ होती. अगदी भल्या पहाटे उठून ५-५.३० वाजता मिट्ट काळोखात बसची वाट बघायची नव्हती. ठरल्याप्रमाणे मी ६.१५ वाजता चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर येथून शेअर रिक्षा पकडली आणि पुढच्या दहा मिनिटात मी स्वारगेट गाठले. स्वारगेट ला ठरलेला थांबा होता HP पेट्रोल पंप, टिळक रोड च्या शेवटी असलेला पापं. हा पापं भटकंती मंडळींसाठी नित्यनियमचा थ...

उसात हरवण्याची किमया

Image
बऱ्याच वर्षांनी मी पुण्याला एकट्याने एक आठवडा राहण्याचा योग आला होता . असे पुन्हा पुन्हा होणे नाही म्हणून मी मनसोक्त भटकंती करण्याचे ठरवले . रविवारी म्हणजे १३ ऑगस्ट २०२३ रोजी सचिन वनारसे आणि विशाल कामठे या शालेय मित्रांबरोबर अहिल्यानगर ( जुने अहमदनगर ), मंगळवारी १५ ऑगस्ट निमित्त पुणे हेरिटेज वॉक तर्फे आयोजित फ्रीडम बाईक ट्रेल , आणि गुरुवारी समीर मासेकर आणि शैलेश उंडे या बालमित्रांबरोबर अपरिचित अशा खंडी असे तीन दिवस , मनातील तीन ठिकाणे फिरून , बघून झाली . खंडी येथे डोंगर, दऱ्या अंगावर हिरवा शालू पांघरून बसलेल्या निसर्गात बागडत असताना फोन वाजला . बघितलं तर सचिन वनारसे . मला वाटलं सहज फोन केला असेल . उचलला तर पहिला प्रश्न , " उद्या , शुक्रवारी शेतात येतोय का ?" मी लगेच माझा होकार कळवून टाकला आणि आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवसाची   धमाल करण्यासाठी सज्ज झालो . दौंड तालुक्यातील यवत गावात , मिठबाव इथे त्यांच्या ७ - ८ एकर मध्ये पसरलेल्या सचिनच्या शेतात जायचे म्हणजे माझ्...