अनपेक्षित गणेशगुळे
पनवेलहुन जनशताब्दी एक्सप्रेस ४ तासात रत्नागिरीला पोचवते. रत्नागिरीहून रिक्षात बसलं की अंदाजे १ तासात गणेशगुळे मध्ये आपण उतरतो. अगदी असेच आम्ही ही अथर्व कोकोनट कॉटेज रिसॉर्टवर पोचलो. सकाळी सकाळी ट्रेन खिडकीतून बाहेर बघितले तर निसर्गानी आपले सुंदर रूप मुक्तपणे दाखवले अथर्व कॉटेजमध्ये आमच्या खोलीपासून समुद्र जेमतेम २० पाउलांवर होता. लाटांची खळखळ स्पष्टपणे आमच्या कानावर निरंतर आदळत होती. खोलीच्या बाहेर एक फॅमिली पोज ताडी माडी उंच बॉडी सामान रूम मध्ये टाकताच मी आणि शीतल बीचवर नजर टाकण्यासाठी निघालो. आणि जाताच गणेशगुळेच्या प्रेमात पडलो. सुंदर बीचवर सुंदर जोडी पांढरी वाळू, स्वच्छ समुद्र आणि निर्मनुष्य स्वप्नवत बीच दुपारचे फक्कड मासे थाळी आणि स्वादिष्ट शाकाहारी जेवण संध्याकाळी जवळच असलेल्या पण अपरिचित अशा नारायण-लक्ष्मी देवळाकडे कूच केली. शांत , निर्मनुष्य , झाडांनी वेढलेल्या परिसरात हे सुंदर मंदिर सापडले. तुम्हीच बघा याची कलाकुसर आणि अस्सल कोकणी ठेवण. चालता चालता अचानक डावीकडे ही पुरातन बारव सापडली सहज नजरेस पडणार नाही असे हे नारायण-लक...