Posts

Showing posts from February, 2023

सुरांशी भेट

Image
२६ जानेवारी २०२३. गुरुवार होता आणि आम्ही , म्हणजे शीतल , ओम आणि मी , असे तिघे दुपारी ४ वाजताच्या पनवेल नांदेड एक्सप्रेस ने पुण्याला निघालो होतो. ऐनवेळी ठरल्यामुळे तात्काळ तिकीट काढावे लागलेले आणि २६ जानेवारी लागून चार दिवस  सुट्टीचा वीकएंड असल्याकारणाने गाडीने जायचे टाळले होते. आमच्या बाजूच्या सीटवर साठीतील एक काका-काकू आसनस्थ होते. डोळ्यात भरणारी आणि चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काकांचा पेहराव. घरंदाज लोक घालतील तसा मोती रंगाचा कुरता , पायजमा आणि त्यावर एक बिनबाहींचे समारंभात घालतात तसे जाकीट. बसल्यापासून दोघांचे चेहेरे गंभीर , आमच्याशी सोडा पण एकमेकांशीही जास्त बोलणे नाही , एकूण रंग बघून माझा प्रथमदर्शनी असा समज झाला की काका तालेवार घराण्यातले , शिष्ट आणि तऱ्हेवाईक इसम  आहेत आणि काकू त्यांच्या स्वभावामुळे आणि दडपणाखाली शांत बसून आहेत. काही वेळातच माझा समज खंडाळ्याच्या घाटातून खाली कोलांट्याउड्या मारत नष्ट होणार होता , कसा ते पाहाच. काय झाले कोणास ठाऊक दोघांनी अचानक झोपायचे ठरवले आणि समोरचा मधला बर्थ तयार केला. ओमनेही बाल्कनी सीट पकडली होती , शीतलही झोपण्यासाठी वरच्या ...