भविष्यातील भूतकाळ
मानवी मन हा निसर्गाचा चमत्कार आहे . माझे मन ही असेच आहे , सूर्य देवतेचे सात घोडे जुंपल्याप्रमाणे ! हे सात घोडे सतत मनाला चहूदिशेने दौडत नेत असतात आणि मनही आनंदाने त्यांच्याबरोबर बागडत असते ... आणि असेच भरधाव मेंदूच्या असंख्य कक्षेतून आणि छुप्या कप्प्यांमधून बागडताना आपोआप मनाचा एक असा कप्पा उघडला जातो की आपल्याला एक वेगळाच साक्षात्कार होतो . हल्ली मी रोज सकाळी व्यंकटेश स्तोत्र वाचन करतो. वाचून झाल्यावर मुखपृष्ठावर असलेले श्री विष्णूंचे मनोहारी रूप डोळे आणि मन भरून बघतो. हा नित्याचा क्रम झाला आहे. असेच एके दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचून झाले आणि मुखपुष्टावर नजर खिळली, आणि तेवढ्यात घोड्यांनी मनाच्या एका अज्ञात कप्प्यात प्रवेश केला. मनाने नजरेशी समन्वय साधला. श्री विष्णूंच्या हातात असलेला शंख, चक्र आणि गदा ही निव्वळ प्रतीके नसून श्स्त्रे आहेत याचा प्रत्यय झाला. पण या विचाराला एक वेगळीच धार होती, एक रोमांचक किनार होता. कारण तो विचार भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांमध्ये वावरत होता. तसा हा विचार वेगळ्या अवतारात बऱ्याच वर...