Posts

Showing posts from April, 2026

मी पाहिलेली हृदय शस्त्रक्रिया

Image
 -  धवल रामतीर्थकर   पुण्यनगरीला राम राम ठोकून मी मुंबापुरीत साल २००२ मध्ये पाऊल टाकले. सुरुवातीचा तो काळ धकाधकीचा पण रोमहर्षक होता. बेधुंदपणे काम करणे , रूममेट्स बरोबर शनिवार-रविवार आरामात किंवा भटकंतीत घालवणे आणि आयुष्याचा आनंद घेणे. त्यावेळी मी खार परिसरात राहत होतो. योगायोग असा की माझा मावसभाऊ हर्षद वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याचवेळी मुंबईत परत आला होता. अधून मधून आमची भेट व्हायची. अशाच एका भेटीत बोलता बोलता विषय निघाला आणि त्याने सांगितले की तो एका हार्ट सर्जनच्या हाताखाली हृदय शस्त्रक्रियेत सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्याने जेव्हा हे सांगितलं त्यावेळी माझ्या डोक्यात ' वाह वाह... क्या बात है ' यापलीकडे कोणते तारे चमकल्याचे आठवणीत नाही.   नंतर कधीतरी निवांतवेळी मनाचे खेळ चालू असताना अचानक डोक्यात वीज चमकली. का नाही हर्षदला विचारायचं की मलाही हार्ट सर्जरी बघायची खूप इच्छा आहे आणि मला तिथे उपस्थित राहणे शक्य होईल का ? त्याकाळी मोबाईल फोन वगैरे फार काही प्रचलित नव्हता. पुढच्यावेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी पुडी सोडली आणि माझी इच्छा व्यक्त केली. जास्तीत ज...