माझे 'ट्रेन' मॉडेलिंग
ट्रेन मध्ये दुसऱ्या श्रेणीने प्रवास करण्यात खरी मजा येते. अनेक प्रकारची माणसे भेटतात, प्रवासापुरती किंवा कायमचीही गट्टी जमते आणि मुख्य म्हणजे प्रवास सुसहाय्यच काय तर अविस्मरणीयही होतो.
अंक पहिला
मला हसताना बघून तो ही माझ्याकडे बघून हसला. फोन झाल्यावर बोलणे सुरू झाले. तो लातूर जवळच्या परळी वैजनाथ इतला रहिवासी. पनवेल जवळच्या पेण ला राहून आश्रम शाळेत शिकवत होता. बोलता बोलता मध्येच त्याने गडबडीने आपल्या बॅग मधून एक आय कार्ड काढले आणि माझ्या हातात कोंबले. मी बघितले तर कोणत्या आदिवासी शाळेत तो कला विषयाचा शिक्षक असल्याचे कळाले. आय कार्ड परत दिले आणि अचानक त्याने विचारले, "तुमचं चित्र काढू का?" एक सेकंद मला कळलेच नाही. भराभर मनात विचार चमकून गेले, हा पैसे मागतो की काय? किती मागेल? हा फसवायचा तर डाव नसेल ना? त्याने आपला एक हात डावीकडे पसरला. मला वाटलं तो मला काहीतरी दाखवत आहे. बघितलं तर हातावरचा अंगठा उभा होता आणि मला खुणावत होता. कलेच्या भाषेत याचा अर्थ एकच, या दिशेकडे, अंगठ्याच्या टोकाकडे बघत राहा. मला खूण कळाली आणि मी मान जर डावीकडे फिरवून अंगठ्याच्या दिशेकडे एकटक बघू लागलो. 5 मिनिटे त्याच्या वहीत तो काही काही रेखाटत होता. पूर्ण होताच त्याने काढलेले माझे स्केच मोठ्या अपेक्षेने माझ्यासमोर धरले. बघितलं तर पानावर दुसराच कोणीतरी होता. लांबट चेहेरा, पठडीतले केस, बारीक डोळे वगैरे वगैरे. नाही म्हणत एक साम्य मला सापडले, आणि ते म्हणजे माझ्या हनुवटीवरचा मास्क त्याने हुबेहूब रेखाटला हे विशेष. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अपेक्षा झळकत होत्या. मीही त्याला निराश करू इच्छित नव्हतो. छान छान म्हणत मी त्याला खुश केले. आता त्याच्या चेहऱ्यावर अपेक्षांची जागा खुशीने घेतली.
त्या चित्रात शोधूनही मी कुठे सापडत नव्हतो म्हणून मला ते रेखाटण मागण्याची इच्छाही झाली नाही. पण ही अनपेक्षित आठवण म्हणून मी एक सेल्फी तो घेतला...तो कला शिक्षक, मी, आणि अर्थात माझे 'न वाटणारे' रेखाटण!
| तो मी नव्हेच! रेखाटन कोणाचे होते कोणास ठाऊक, मी तरी त्यात नव्हतो हे नक्की |
हा किस्सा इथे संपला. बोलता बोलता कला शिक्षक त्यांची
रेखाटनाची, कोऱ्या पानांची वही चाळत होते आणि अचानक एक रंगीत कौलारू घराचं चित्र
समोर आलं. दुसऱ्याच क्षणी ते चित्र त्यांनी माझ्यासमोर धरलं, "हे माझ्याकडून
तुम्हाला भेट." कोकणातील कौलारू घराचं चित्र असल्याकारणाने बघताक्षणी मला ते
चित्र आवडलं होतं. साहजिकच मी या भेटीचा लगेच स्वीकार केला आणि लगबगीने चित्र
बॅगेत घातलं.
| मला भेट मिळालेले रंगीत चित्र |
अंक तिसरा
लोणावळा
स्थानक आलं आणि आमच्या डब्यातली अर्धी गर्दी कमी झाली. कला मास्तर आता खुश होते.
कर्जत गेल्यावर चहा झाला होता आणि मी त्याचे पैसे दिले म्हटल्यावर त्यांचा चेहरा
आणखी खुलला. दुसऱ्या कोणी त्यांचे पैसे देतील अशी त्यांची अपेक्षाच नसावी.
त्यामुळे लोणावळाला सीट रिकाम्या झाल्यावर ते लगेच माझ्याशेजारी येऊन बसले. बरोबर
रेखाटण्याची वही पण होती. हळूच म्हणाले, "तुमचे चित्र काढू का?" मी
अशचर्यचकित झालो. "माझं चित्र आधीच काढून झालं आहे," मी त्यांना आठवण
केली. "हो झाली आहे, पण ते जरा बरोबर नाही झालं. पटापट केलं होतं ना त्यामुळे
ठीक नाही झालं", असं म्हणून परत त्यांचा अंगठा उभा राहिला आणि माझी मान त्या
दिशेकडे वळाली. म्हणजे त्यांनाही कळालं होतं की आधीचे रेखाटन चांगलं झालं नव्हतं.
पण या वेळेचं रेखाटन आधीच्या प्रयत्नापेक्षा बरंच चांगलं
झालेले दिसले. चेहरा सगळ्या अँगलने माझाच वाटत होता, हुबेहूब नाही पण चलता है. मी
परत छान छान म्हटले, पण या वेळी खरं खरं. त्याने रेखाटनाचे पान फाडून, त्यावर सही केली आणि एक लांबलचक नंबर लिहिला. नंतर मला कळले की तो
त्यांचा फोन नंबर आहे.
| दुसऱ्या वेळी जरा जमलं म्हणायचं |
मी त्यांचे आभार मानले आणि माझ्याकडे असलेल्या मार्वल केक त्यांच्या कलेला अर्पण केला. अशा प्रकारे माझ्या मॉडेलिंग चा शेवट गोड झाला.
रेल्वे दुसरी श्रेणी जिंदाबाद!
| पलीकडे खिडकीत बसलेले ते गोविंद म्हस्के, कला मास्तर. जो कोण त्यांच्यासमोर येई त्यांचे रेखाटण तयार होई. |
फारच छान
ReplyDeleteधवल प्रवास चित्र छान रेखाटलं आहेस.
ReplyDeleteधन्यवाद सुहास
Delete7020137222 सुंदर लेख 👌
ReplyDelete