पनवेलहुन
जनशताब्दी एक्सप्रेस ४ तासात रत्नागिरीला पोचवते. रत्नागिरीहून रिक्षात बसलं की
अंदाजे १ तासात गणेशगुळे मध्ये आपण उतरतो. अगदी असेच आम्ही ही अथर्व कोकोनट कॉटेज
रिसॉर्टवर पोचलो.
 |
सकाळी सकाळी ट्रेन खिडकीतून बाहेर बघितले तर निसर्गानी आपले सुंदर रूप मुक्तपणे दाखवले
|
अथर्व कॉटेजमध्ये आमच्या खोलीपासून समुद्र जेमतेम २० पाउलांवर होता. लाटांची खळखळ
स्पष्टपणे आमच्या कानावर निरंतर आदळत होती.
 |
खोलीच्या बाहेर एक फॅमिली पोज
|
 |
| ताडी माडी उंच बॉडी |
सामान रूम मध्ये टाकताच मी आणि शीतल
बीचवर नजर टाकण्यासाठी निघालो. आणि जाताच गणेशगुळेच्या प्रेमात पडलो.
 |
| सुंदर बीचवर सुंदर जोडी |
 |
पांढरी वाळू, स्वच्छ समुद्र आणि निर्मनुष्य स्वप्नवत बीच
|
 |
दुपारचे फक्कड मासे थाळी आणि स्वादिष्ट शाकाहारी जेवण
|
 |
|
संध्याकाळी
जवळच असलेल्या पण अपरिचित अशा नारायण-लक्ष्मी देवळाकडे कूच केली. शांत,निर्मनुष्य, झाडांनी वेढलेल्या परिसरात हे सुंदर मंदिर
सापडले. तुम्हीच बघा याची कलाकुसर आणि अस्सल कोकणी ठेवण.
 |
| चालता चालता अचानक डावीकडे ही पुरातन बारव सापडली |
 |
| सहज नजरेस पडणार नाही असे हे नारायण-लक्ष्मी देऊळ. आसपास कोणता नवफलक नाही, की कोणी माणूस नाही |
 |
| ही सुंदर दीपमाळा बघूनच या लक्ष्मी नारायण देवळाला भेट द्यायचा निश्चय झाला |
 |
| बाहेर दीपमाळेच्या बाजूलाच पूर्ण दगडी असे तुळशीवृंदावन लक्ष वेधून घेते |
 |
| विष्णू-लक्ष्मी मूर्ती सुंदर, सुबक तर होतीच पण गाभाराही साधा व मूळ स्वरूपात असलेला बघून बरं वाटलं |
| समोरून बघितले तर फक्त मगर, तिच्याच खाली बघितले तर नाग |
 |
| मंडपात लाकडी खांबांवर अतिशय सुंदर कोरीव काम आढळले |
 |
| मंडपातले आणि गाभाऱ्यातले लाकडे वासे तर तोंडात बोट घालायला लावणारे होते |
 |
| जणू विष्णूच्या देऊळात शंकराच्या जटा |
 |
| देऊळाबाहेर ही अनोखी मारुती मूर्ती खडा पहारा देत उभी आहे. बाहुबलीलाही तुच्छ ठरवेल अशी पीळदार शरीरयष्टी कोरली आहे. हा खरा मारुती राया ! |
 |
| दीपमाळेच्या खाली हा आखीव रेखीव गरुड लगेच नजरेस पडत नाही. काय बघू आणि काय नको असे झालेले असते |
 |
| देऊळ परिसरातच ही पुरातन, वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे |
 |
| लक्ष्मी नारायण देऊळाशेजारीच शंकराचे त्याला साजेसे देऊळ आहे |
बरंच
ऑनलाईन शोधून, विचारूनही अजून मला या नारायण-लक्ष्मी
देऊळाबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
दिवस दुसरा
दुसऱ्या
दिवशी गाडी करून आधीच ठरलेली प्राचीन देवळांत देवांच्या भेटीसाठी निघालो. पण
त्याआधी ताजी ताजी,
नुकतीच
झाडावरून काढलेली माडी रिचवली.
पहिले
गाठले गणेशगुळे मधील प्राचीन गणपती देऊळ. ही देऊळ अंदाजे ४०० वर्षांपूर्वीचे आहे. असे म्हणतात की गणपतीपुळे देवळात जी गणपती मूर्ती आहे ती आधी या गणेशगुळे देऊळात स्थापन होती. काही भ्रष्ट कारणामुळे मूर्ती गणपतीपुळेला हलवण्यात आली.
 |
| लहान मुलांची मोठी मागणी |
 |
| उंदीर मामा जरा वेगळेच, दुःखी वाटले |
 |
| गणपतीफुल्ल घंटा |
देऊळासमोरच
एक प्राचीन पांडवकालीन विहीर असल्याचे वाचले होते.
 |
| बाहेरून बघितले तर काहीच कळत नाही |
जवळ जाऊन बघितले तर खाली, खोल अंधारात गुडूप होणाऱ्या पायऱ्या दिसल्या. उतरून गेलो तर खाली विहीर, कधीही न पाहिलेली अशी विहीर!
 |
| पृथ्वीच्या पोटात जाणाऱ्या एवढ्या अरुंद आणि निमुळत्या पायऱ्या बघून नवलच वाटलं |
 |
| विहिरीत उतरून वर बघितले तर कळले किती खोल विहीर आहे ती |
 |
| तळाशी डराव डराव आहेत म्हणजे पाणी स्वच्छ असणार |
यानंतर
कणकादित्य सूर्य देऊळ
माहिती प्रमाणे कणकादित्य देवळातील सूर्य देवाची मूर्ती १००० वर्षांपूर्वीची आहे. अप्रतिम
सागवान आणि शिसम लाकडापासून आतली रचना साकारली आहे. जेमतेम ४ वर्षांपूर्वीच याचे
नूतनीकरण झाले. सुदैवाने रंगरंगोटी न करता, मार्बल वगैरेच्या मोहात न पडता सुंदर सजवले आहे.
 |
| छतावर आकर्षक, रंगीबेरंगी प्रसंग कोरलेले दिसतात |
 |
| जेमतेम चार वर्षांपूर्वी पुण्याच्या एका भक्ताने १.२५ कोटी रुपये खर्चून ही लाकडी सजावट केली आहे. |
 |
| सागवानी लाकडाच्या सजावटीला साजेसा पंखा |
 |
| पुरातन दगडी पायऱ्या आणि हल्लीचे मॉडर्न घर यांचे मिलन |
 |
| विहिरीतून पाणी काढण्यासाठी अवलंबलेली पुरातन पद्धत |
 |
| १००० वर्षांपूर्वीचे कणकादित्य देऊळ |
 |
| देऊळाबाहेरचा सुंदर, स्वच्छ परिसर |
जाता
जाता दुकानवाल्यानी एक अद्भुत गोष्ट नजरेस आणून दिली. एका विशिष्ट जागी नेऊन आम्हाला कळसाकडे बघायला सांगितले. बघितलं तर अचंबित झालो. गाभाऱ्याला एक नाही तर दोन कळस! अजून आश्चर्याची गोष्ट अशी की छतावर धातूचे आवरण दिसते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा धातू फ्रांस वरून मागवला गेला होता, ४००-४५० वर्षांपूर्वी!
 |
| बघितलं तर देऊळाला खरंच २ कळस आहेत, आणि धातूचा पत्राही! |
पुढचे
ठिकाण आडिवरे येथील प्राचीन महाकाली देऊळ. देऊळ भव्य, पण प्राचीनता लुप्त पावलेली.
 |
| हे आकर्षक घड्याळ, बारसिंघाची शिंगे आणि छातीवरचे रंगीत कोरीव काम हीच महाकाली देऊळाची प्रमुख आकर्षणे |
 |
आवारात एका झाडाखाली या मुर्त्या ठेवल्या होत्या. कसल्या असतील या?
|
 |
बाजूच्या देऊळात शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची सुंदर फ्रेम होती.
|
 |
| हा दिशादर्शक वाघ |
धूतपापेश्वर
देऊळ निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे असं वाचलं होतं. पण जेव्हा ते स्वतःच्या
डोळ्यांनी बघितले तेव्हा अधिकच मोहक, मनाला भुरळ घालणारे ठरले.
 |
| ही नंदीची मूर्ती बघा. शिंग, पाय, तोंड सगळं किती नाजूक दिसते |
 |
| या गाईची एक आख्यायिका आहे. शेकडो वर्षांपूर्वी एक गाय या शंकराच्या पिंडीच्या जागी येऊनच एका दगडावर दूध द्यायची. रोजच्या रोज हाच क्रम. एक दिवस चिडून तिच्या मालकाने कुऱ्हाड घेतली आणि त्या गाईला मारायला धावला. जसा तो गाईच्या पाठीवर घाव घालणार तशी त्या गाईने बाजूच्या घळीत, पाण्यात उडी मारली आणि कुऱ्हाडीचा घाव पिंडीवर बसला. यामुळे धूतपापेश्वर पिंडीचा एक तुकडा तुटलेलाच आहे. हल्लीच कोणी ही पंचधातूची गाईची मूर्ती दान केली आणि इथे बसवली. |
 |
| हे वसंत ठाकूर, धूतपापेश्वर देऊळात बसलेले दिसले. आम्ही बाहेरचे गिऱ्हाईक पाहून त्यांनी आपला एकांकी प्रयोग सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंची नक्कल, वेग वेगळे आवाज, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर व इतर अनेक एकपात्री कार्यक्रम किमान अर्धा तास चालू होता. शेवटी त्यांना आमच्याकडून रु५०० ची बिदागी मिळवली. डाव्या हातात पिशवी दिसत आहे ना, त्यात त्यांची नखे आहेत. |
 |
| निसर्गाच्या कुशीत स्थापित धूतपापेश्वर देऊळ. बघावे असे काही. |
धूतपापेश्वर देऊळ हे खूप आडवाटेवर असल्यामुळे वाटेत कुठेही खाण्याची सोय नाही. त्यामुळे वाटेत एकुलतं एक
पंजाबी हॉटेल सापडलं तिथेच जेवण उरकून पुढे प्रस्थान केले.
 |
| हॉटेल बाहेरच एक छान झोपाळा लावलेला दिसला आणि वारेही मस्त सुटले होते. |
शेवटचे स्थळ पावस येतील स्वामी स्वरूपानंद आश्रम. दुर्दैवाने कोविड मुळे बराचसा आश्रम बंद ठेवला गेला होता. तळघरातील ध्यान खोलीही बंद केली होती त्यामुळे थोडं हिरमुसल्यासारखं झालं. |
| स्वामींचे देऊळ सोडून बाकी सर्व बंद. त्यामुळे आम्ही बसून होतो. |
तिथून
थेट गणपतीपुळे. पण त्याच्याआधी CNG च्या
लफड्यात चाय तो बनता है ना!
 |
| हायवेवर चहाची टपरी दिसणेही अवघड. शोधून शोधून एक चहाची गाडी रस्त्याकडेला सापडली आणि नशीबाने चहाही चांगला होता. |
 |
| जसे गणपतीपुळे जवळ येऊ लागले तसे सुंदर समुद्रकिनारे नजरेस पडायला लागले. दुधात साखर,सूर्यास्तानेही अचूक वेळ साधली. |
संकष्टी
असल्यामुळे त्याच दिवशी गणपतीपुळे येथील गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे ठरले आणि
तेवढ्यात नवीन नियम समजला. कोविडमुळे रात्री ८.३० वाजताच देऊळ बंद केलं जातं. आमची नशीब
आजमावायचे ठरवले. सुदैवाने आम्हाला आत प्रवेश मिळाला आणि छान, धक्का बुक्कीचा प्रसाद न मिळत दर्शन मिळाले.
 |
| गणपतीपुळे येथील गणपती देऊळाबाहेर |
गणपतीपुळेत पोचल्यानंतर दुसऱ्या
दिवशी सकाळी निलेश (साडू) ११ प्रदक्षिणा मारणार होते, आणि मी जमेल आणि वाटेल तितक्या, ३ किंवा ५!
३
प्रदक्षिणा मला बस्स झाल्या पण निलेशने ११ पूर्ण केल्या!
नंतर शीतल, ओम आणि राणी (शीतलची मोठी बहीण) आले. मग त्यांच्याबरोबर अजून एक प्रदक्षिणा मारली.
 |
| प्रदक्षिणा मार्गात ही बारव येते. पहिल्या तीन प्रदक्षिणा मारताना मला ही बारव दिसलीच नाही. |
 |
| पाय असलेले झाड |
 |
| असंच |
 |
| कोविडमुळे प्रदक्षिणा संपल्यावर देऊळाबाहेरून जावे लागते. बाहेर जिथे पडतो तिथे बांबूचा दरवाजा करण्यात आला होता, जो ओम साठी एक खेळ झाला. |
प्रदक्षिणा झाल्यावर ओमला
बीचवर मज्जा करण्याची मोकळीक मिळाली.
संध्याकाळची
वेळ गणपतीपुळेच्या शांत समुद्रात डुंबण्यासाठी राखून ठेवली होती. नेहमीसारखीच या वेळीही गणपतीपुळे समुद्रात, बीचवर मनसोक्त मज्जा केली.
शेवटचा
दिवस, रत्नागिरी दर्शन.
अभय
परबच्या कृपेने सावंत भेटले आणि एका रिक्षात आम्ही सहा जण निवांतपणे रत्नागिरी
गाठले. पहिल्यांदा लोकमान्य टिळकांचे घर.
 |
| मागच्या बाजूची जुनी कौले मोडकळीस आली आहेत. बहुदा वानरांची करामत |
 |
नशीब बलवत्तर - ज्या दिवशी आम्ही लोकमान्य टिळकांचे घर बघण्यासाठी गेलो त्याच दिवशी दुपारी १२.३० पासून कॅव्हिड नंतर ते सुरु करण्यात आले होते.
|
 |
दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना. पण वरचा मजला बघण्यासाठी खुला नाही.
|
 |
दरवाज्याच्या जाळीतून बघितले तर वरच्या तीन खोल्यांचे तीन दरवाजे दिसले
 | गेट मधून आत जाताच डावीकडे लोकमान्यांच्या पुतळा आहे.
|
|
 |
| पुतळ्याच्या मागे हे शिल्प आहे |
यानंतर आम्ही गेलो थिबा राजवाडा बघायला. ब्रिटिशांना ब्रह्मदेश वर कब्जा करण्यात उपद्रव नको म्हणून तिकडच्या राजाला रत्नागिरीमध्ये नजरकैदेत ठेवले होते. कैद एवढी आलिशान असे शकते हे राजवाडा बघून कळते.
थिबा राजवाड्यावरून थेट रत्नागिरी रेल्वे स्टेशन असा मार्ग ठरला होता.
पण त्याआधी रत्नागिरी बाजारात ताजा भाजीपाला घेण्यासाठी थांबा तर हवाच ना. तर तिथेही उतरताच एक विठ्ठल-रखुमाई चे देऊळ दिसले. दर्शनासाठी आम्ही आत गेलो तर आम्हाला दर्शन आणि आशीर्वाद द्यायला सगळे देव हजर.
 |
| एकमुखी दत्त |
 |
| गरुड देव |
 |
| आकाशात झेप घेण्याच्या तयारीत गणपती बाप्पा |
 |
| घोडे हाकत सूर्य देव |
 |
| जुन्या काळातील लिहिण्याची खुर्ची |
 |
| ही गायमुख पाणपोई रत्नागिरी बाजारात सापडली |
ठीक ५ वाजता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर उभे होतो. अशा प्रकारे ही पूर्ण सहल अनपेक्षित घटनांनी, स्थळांनी नटलेली अशी झाली.
पहिल्या दिवशी गणेशगुळे बीच अनपेक्षितपणे सुंदर होते. मग अनपेक्षितपणे
नारायण-लक्ष्मी चे अद्भुत देऊळ बघायला मिळाले. अथर्व कोकोनट कॉटेज मध्ये सोयी
नसल्याकारणाने अनपेक्षितपणे एका दिवसातच काढता पाय घेतला.
दुसऱ्या
दिवशी अनपेक्षित असे सुंदर कणकादित्य देऊळ आणि धूतपापेश्वर देऊळ. अनपेक्षितपणे
गणपतीपुळे देवळात दर्शन मिळाले.
तिसऱ्या
दिवशी गणपतीपुळे बीचवर अनपेक्षितपणे धम्माल केली. चौकशी करता करता अनपेक्षितपणे
वरद-विनायक नावाचे वेगळे हॉटेल सापडले.
चौथ्या
दिवशी अनपेक्षितपणे किरण सावंत यांची भेट झाली. आणि अनपेक्षितपणे जनशताब्दी
एक्सप्रेस उशिरा आली आणि भयंकर उशिरा पनवेलला पोहोचली.
आणि
शेवटचे अनपेक्षित म्हणजे मध्यरात्री घरी पोहोचल्यावर २ वाजताचा चहा आणि टोस्टची
मेजवानी मिळणे!
जाता जाता माझी ही दोन आवडती झाडे बघून जावा. एक गणपतीपुळेत आहे, भर रस्त्यात. आणि दुसरे रत्नागिरी बाजारात विठ्ठल-रखुमाई देऊळाच्या आवारात.
 |
| गणपतीपुळे मुख्य रस्त्याच्या मध्ये |
 |
| रत्नागिरी बाजारात विठ्ठल रखुमाई देऊळात |
खूपच सुंदर. आता मी सुध्दा ही सफर केली. मी इतकी त्यात रमले की मस्तच....फोटो अतिशय सुंदर.
ReplyDeleteवाह फारच छान लेखन आणि फोटो
ReplyDeleteफारच सुंदर
ReplyDeleteतुम्ही सर्व खूप उत्साही आहात
निसर्ग सौंदर्य देऊळ फोटोग्राफी अप्रतिम सगळं बघून आपण अनुभव घेतला पाहिजे असं वाटत ग्रेट
Khup chaan varnan kele aahe..
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteNice and beautiful
ReplyDelete