नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने
ऑगस्ट-सप्टेंबर महिने म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या दैवतेच्या आगमनाची चाहूल आणि लगबग दोन्ही एकत्र घेऊन येणारे महिने. अशातच पर्यावरण जपून गणपती बाप्पांची शाडूची मूर्ती बनवण्याकडे वाढता कल लक्ष वेधून घेणारा असतो. विविध ग्रुप ऑनलाईन किंवा ऑफलाईन गणपती मेकिंग वर्कशॉप (पैसे घेऊन किंवा स्वेच्छेने) घेत असतात.
रोटरी क्लब ऑफ खारघर, या रोटरीच्या शाखेने असाच एक पर्यावरण प्रेमी गणपती मूर्ती बनवण्याचा वर्कशॉप २५ ऑगस्ट २०२४ रोजी घ्यायचे जाहीर केले. हा वर्कशॉप फेसबुक लाईव्ह आणि गूगल मीट वर होणार होता. मी या वर्कशॉपची खूप उत्सुकतेने वाट बघत होतो कारण गेली काही वर्षे मला घरीच मूर्ती बनवावीशी इच्छा होती. पण हस्तकला आणि माझं लहानपणापासून काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे कोणी शिकवणारा पाहिजे होता. ती संधी आपसूक चालून आली. योगायोगाने पुण्याला गेलो असताना मला एका हार्डवेअर दुकानात आकस्मितरित्या शाडूची मातीही मिळाली. साठ रुपयांना दोन किलो!
ठरल्या प्रमाणे २५ ऑगस्टला मी आणि ओम (माझा आठवीत असलेला सुपुत्र) दोघांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली आणि टॅब समोर आसनस्थ होऊन गणपती बाप्पा बनवायला सुरुवात केली. सुरुवातच गमतीशीर झाली. शाडूची कोरडी माती मळून घ्यायची होती, ती मळताच येईना. सगळं हात शाडू मातीने चिकट चिकट होऊन बसला. त्यात परत शिकवणाऱ्या बाईंनी आधीच माती मळून ठेवली होती आणि तिथून पुढे त्यांनी शिकवायला सुरु केले. त्यामुळे माझी आणि ओमची खूप तारांबळ उडाली. कसं बसं आम्ही बाईंच्या सूचना पाळत होतो आणि आमची मूर्ती आकार घेत होती. बाप्पाचे पाय करून झाले, पोट झालं, मोदक धरलेला हात, आशीर्वाद देणारा हात दोन्ही करून झाले. त्यावर डोके ठेवले आणि काही केल्या सोंडेचा आकार जमेना. मी आणि ओम एकापाठोपाठ सोंडी करत होतो पण काही केल्या जमेना.
एवढ्यात एक आवाज आला, "मॅडम आज आप क्या बना रही हो?" एक १०वी बारावीतल्या मुलाचा आवाज होता. यावर शीतल वारेय मॅडमने निरागस उत्तर दिले, "आज हम गणपती की मूर्ती बना रहे है".
पहिल्या प्रश्न विचारून झाला आणि तोच तोच प्रश्न परत परत वेगवेगळे लोक विचारू लागले. आता मॅडमना आणि आम्हाला कळलं की कोणीतरी मवालीगिरी आणि मस्करी करत आहे. शीतल मॅडमनी तसेच सांगणे चालू ठेवले. पण ही तर सुरुवात होती.
दुसऱ्याच क्षणी अंगविक्षेप करून नाचणाऱ्या नातीच्या गाण्यांचा व्हिडिओ स्क्रीन वर प्रोजेक्ट केला गेला. आता शीतल मॅडमचे स्क्रीन गायब झाले होते आणि एकापाठोपाठ अनेक गाणी प्रोजेक्ट केली जात होती. हे करणारा एक इसम नव्हता तर ४-५ वेगवेगळे इसम होते. या हुल्लडबाजीमुळे गणपती मूर्ती वर्कशॉप ठप्प झाला होता.
इथे न थांबताच त्यांचे अतिशय असभय संभाषण जाणूनबुजून सुरु झाले. 'ए लवडे के बाल, चुतिया आणि असे अनेक शब्द वापरून त्यांनी आपापसात संभाषण सुरु केले. ही अर्वाच्च भाषा ऐकून जे व्हायचे तेच झाले. या अश्लील टोळक्यापासून वाचण्यासाठी अनेक मुला-मुलींच्या पालकांनी वर्कशॉप सोडला आणि लॉग ऑफ झाले. तरी या हिंदू द्वेषी मुलांचे चाळे चालूच राहिले. मी एक दोनदा मॅडम ना सांगितले, मेसेज केले की या व्यक्तींना 'Mute' करा किंवा त्यांना मीट मधून काढून टाका. पण मॅडम आणि त्यांचे सहकारी मीडिया savy नसल्यामुळे किंवा अचानक झालेल्या या प्रकाराने गांगरून जाऊन त्यांच्याकडून काहीच हालचाल केली गेली नाही.
काही वेळाने एक एक करून या टोळक्यातील व्यक्तींना बाहेर काढायला शेवटी मॅडमच्या सहकाऱ्यांना जमले आणि मीट मध्ये शांतता पसरली. पण जे व्हायचे तेच झाले होते. भाग घेतलेल्या बहुतांश मुलांनी किंवा व्यक्तींनी या असभ्य प्रकारापासून वाचण्यासाठी मीट सोडली होती. आणि दुसरे म्हणजे जे काही अजून उरले होते त्यांना गणपती बाप्पाच्या डोक्यावरचा मुकुट आणि डोळे कसे बनवायचे ते कळलेच नाही.
या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट जाणवली की हिंदू द्वेषी व्यक्तींनी हिंदूंच्या सणांना, रीतींना बाधा आणण्याचा प्रयत्न अत्यंत नियोजित पद्धतीने सुरु केला आहे. हा नवीन युगात, नवीन पिढीचा वापर करून हिंदूंच्या चाली रीत्यांमध्ये जाणूनबुजून अडथळा निर्माण करण्याचा सूजनियोजीत कट रचला गेला आहे असे वाटते. जेणेकरून हिंदू समाज आपल्या परंपरा, चाली, संस्कृती यांबद्दल अनभिज्ञ राहील आणि हा त्यांचा कुधर्म वाढेल असा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो.
आणि अशा प्रकारे पुढील ५ मिनिटात अनामिक मॅडमनी मूर्ती तयार झाली आणि कार्यक्रमाची समाप्ती झाली. शेवटी फक्त अनामिक मॅडम आणि मी-ओम एवढेच उरलो होतो. हिंदू देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा कार्यक्रम उधळण्याचा त्यांचा हेतू सफल झाला ही खेदाची आणि रागाची गोष्ट आहे.
या अनुभवाद्वारे हिंदू संस्कृती नष्ट करण्याच्या नवयुगातील एका नव्या धोरणाची आणि धोक्याची माहिती मिळाली.
सावध राहा. तंत्रज्ञानाशी गट्टी करा आणि हिंदू-द्वेषी समाजाचे प्रयत्न हाणून पाडूया!
![]() |
| ओमने आणि मी साकार केलेली शाडूच्या मातीची पहिली वाहिली गणपती मूर्ती |
- धवल रामतीर्थकर


Beautiful ....Om....superb
ReplyDelete